श्रीनगर : सरकारने सोमवारी तब्बल ७२ दिवसांनी काश्मीर खोऱ्यातील ४० लाखांहून अधिक पोस्टपेड मोबाईल ग्राहकांची सेवा सुरू केली. यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर प्रथमच येथील नागरिकांना आपले कुटुंबीय, मित्र परिवार व आप्तेष्टांशी संवाद साधता आला. सरकारने मोबाईल सेवा सुरूकेली असली तरी येथील ‘इंटरनेट’सेवेला अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही. त्यामुळे तूर्तास तरी काश्मिरींना समाज माध्यमांद्वारे बाह्यजगताशी संवाद साधण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे..
प्रशासनाने गत शनिवारीच खोऱ्यातील पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली होती. तद्नुसार, सोमवारी दुपारी काश्मीरमधील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. तद्नंतर खोऱ्यातील सर्वच नागरिक आपल्या नातेवाइकांशी मोबाईलवरून संवाद साधताना दिसून आले. गत ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे २ केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले होते. तेव्हापासूनच येथील मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती. ‘सद्य:स्थितीत केवळ पोस्टपेड मोबाईल सेवाच सुरू करण्यात आली आहे.
आता नागरिकांना फोन कॉल व एसएमएस सुविधेचा लाभ घेता येईल; पण व्हॉट्सॲपसह २५ लाखांहून अधिक प्रीपेड मोबाईल फोन व अन्य इंटरनेट सुविधा तूर्तास बंदच राहील,’असे प्रशासनाने यासंबंधी स्पष्ट केले. खोऱ्यातील कनेक्टिव्हिटी १२ ऑगस्ट रोजी ईदच्या ऐन तोंडावर खंडित करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी ही सेवा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांनी प्रथम एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ‘हा दिवस आमच्यासाठी ईदहून कमी नाही.
जागतिकीकरणाच्या काळात गत २ महिन्यांपासून आमचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला होता,’ असे खोऱ्यातील निगहत शाह नामक एका व्यक्तीने सांगितले. जुन्या शहरात राहणाऱ्या बशरत अहमद यांनीही मोबाईल सुरू झाल्यानंतर लगेचच आपले मित्र व नातेवाइकांना फोन करण्यास थोडाही विलंब केला नाही. त्यांनी एका तासाच्या आत तब्बल ३० फोन कॉल केले. ‘मी ७० दिवसांपासून माझ्या नातेवाइकांशी चर्चा केली नव्हती. मला त्या सर्वांना आम्ही जिवंत असल्याचे सांगायचे आहे,’ असे ते म्हणाले.
- MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- बालिकाश्रम रस्ता, बोल्हेगावात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली !
- PAN Card Loan : पॅन कार्ड वरून कर्ज कसे मिळवायचे ?
- Elon Musk च्या पहिल्या Wife ने सांगितला यशाचा सिक्रेट फॉर्म्युला !
- महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद ! शिंदे गटात पडली फूट ? 20 आमदारांचा पाठिंबा घेऊन नवा नेता…