नवी दिल्ली : देशात मागील ६ वर्षांपासून रोजगारात सर्वात मोठी घट नोंदवली आहे. एका नव्या अध्ययनानुसार, मागील ६ वर्षांत रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट आलेली असल्याचे म्हटलेले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रोजगाराच्या घसरणीला सामोरे जावे लागत आहे.
२०११-१२ ते २०१७-१८ च्या दरम्यान भारतात रोजगाराच्या संधीमध्ये घट आली आहे. हा अहवाल संतोष मेहरोत्रा आणि जे.के. परिदा यांनी तयार केलेला आहे. मेहरोत्रा आणि परिदा यांच्या मते, २०११-१२ ते २०१७-१८ च्या वर्षात एकूण रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट झालेली आहे.

भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेले आहे. ऑटोमोबाईल्स, सिमेंट, लोखंड उद्योगांवर संक्रात आल्यापासून देशातील एकूणच उत्पादनात कमालीची घसरण पहायला मिळत आहे. बाजारात मागणीच नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन थांबवले असून काही कंपन्यांनी अतिरिक्त साठा करण्यासही नकार दिला आहे. दुसरीकडे रोजगार क्षेत्रातही मंदी निर्माण झाल्याने देशासमोर येत्या बेरोजगारांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता ! GR पहा…
- Bank of Baroda Peon Jobs 2025: दहावी उत्तीर्णांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी मोठी बातमी ! 14 मे 2025 रोजी महत्वाचा जीआर निघाला
- Middle Class लोकांसाठी Vi ने लॉन्च केले जबरदस्त प्लॅन्स ! मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, डेटा
- PM Kisan योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर; ‘या’ लोकांना येणार नाही जूनचा हप्ता