विजयवाडा- अल्पवयीन मुलींना पुरुषाचा वेश बनवून, मुलींशी मैत्री करून, मुलींना आमिष दाखवून शरीर संबंध बनवण्यासाठी बळजबरी करून लैगिक शोषण केल्याप्रकारणी ३२ वर्षीय महिलेविरोधात पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये घडली आहे.
अधिक माहिती अशी की, प्रकाशममध्ये जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. कृष्ण किशोर रेड्डी नावाची व्यक्तीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने तक्रारीत केला.

यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. आरोपी कृष्ण किशोर हा पुरुष नसून एक महिला असल्याचं पोलिसांना चौकशीत आढळून आलं.
तिने आपले केस पुरुषांसारखे छोटे ठेवले होते आणि पुरुषाच्या वेषात ती अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत होती, असं पोलिसांना चौकशीत आढळून आलं.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना सेक्स टॉयने भरलेली एक बॅग सापडली. या दरम्यान आरोपी महिलेच्या पतीची पोलीस चौकशी करत होते.
या चौकशी वेळी तिचा पती पळाला आणि त्याने इमारतीवरून उडी घेतली.
पोलिसांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केलं. पण त्यात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत व्यक्ती हा आरोपी महिलेचा तिसरा पती होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- Pune-Nashik Expressway : पुणे ते नाशिक फक्त ३ तासांत! सरकारचा २८,००० कोटींचा धडाकेबाज महामार्ग प्रकल्प
- आधार अपडेटसाठी नवे नियम लागू! आता नाव, फोटो, पत्ता बदलण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे
- सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मागे पडला, भारताच्या ‘या’ नवख्या खेळाडूने कसोटीत केला अनोखा विक्रम!
- FD पेक्षा अधिक परतावा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल 8.20% ने व्याज, महिन्याला करा बक्कळ कमाई
- अहिल्यानगर शहरातून जाणारी अवजड वाहने बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलची मागणी, शहर पोलीस उपाधीक्षकांना निवेदन