Nitin Gadkari : देशातील ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर अधिक भर देत आहेत. तसेच केंद्र सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. बाजारात आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने सादर केली आहेत.
दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची देशात क्रेझ वाढत आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते घेणे शक्य होत नाही. मात्र तुमच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे.
जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक आहेत म्हणून ते खरेदी करत नसाल तर घाबरू नका. नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीमध्ये घट होणार आहे.
नितीन गडकरी यांच्या निर्णयामुळे येत्या वर्षी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असाल तर थोडं थांबा तुम्हालाही नितीन गडकरींच्या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.
नितीन गडकरींची इलेक्ट्रिक वाहनांबाबत नवीन योजना काय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेटल रिसायकलिंगकडे खूप लक्ष देत आहेत. यामध्ये त्याची प्रक्रियाही जलद करण्यात आली आहे. मेटल रिसायकलिंगनंतर, ऑटो घटकांची किंमत 30% कमी केली जाऊ शकते. यासोबतच ऑटोमोबाईल क्षेत्राचा आकार दुप्पट करण्याची नितीन गडकरींची योजना आहे.
ऑटोमोबाईल रिसायकलिंगचा काय फायदा होईल
व्हेईकल सॅल्व्हेज पॉलिसीमुळे देशातील मेटल रिसायकलिंग प्रक्रियेला मोठी चालना मिळणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत जुन्या वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या धातूंचा पुन्हा पुनर्वापर करून नवीन वाहने बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.