Nokia C12 Plus Smartphone : खिशाला परवडणारा नोकियाचा स्मार्टफोन लॉन्च! जाणून घ्या जबरदस्त फीचर्स आणि किंमत

Published on -

Nokia C12 Plus Smartphone : नोकिया कंपनीच्या स्मार्टफोन्सची भारतात पहिल्यापासूनच क्रेझ आहे. जुने मोबाईल ते स्मार्टफोन्सपर्यंत नोकियाचे अनेक फोन अधिक लोकप्रिय आहेत. आता स्मार्टफोन्सचा जमाना आला आहे. त्यामुळे जुने फोन नाहीसे होत आहेत.

आता नोकिया कंपनीकडून खिशाला परवडणारा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये दमदार फीचर्स असणारा स्मार्टफोन मिळत आहे. Nokia C12 Plus स्मार्टफोन असे या नवीन स्मार्टफोन नाव आहे.

नोकिया कंपनीकडून सी12 प्लस सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सी सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा या वर्षातील तिसरा स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीने Nokia C12 आणि Nokia C12 Pro लॉन्च केला आहे.

Nokia C12 Plus स्मार्टफोन वैशिष्ट्ये 

या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी रॉम म्हणजेच इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तुम्ही या स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने हे 256 जीबी पर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसेच नोकिया कंपनीकडून नवीन स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Unisoc SC9863A1 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला MicroSD 2.0 पोर्ट अंतर्गत 10W चार्जिंग सपोर्ट मिळतो.

BrandNokia
ModelNokia C12 Plus Smartphone
Display Size6.3 Inches
Display TypeIPS LCD Display
Refresh Rate60 Hz
Storage2GB/32GB
CameraRear 8 MP and Front 5MP
Battery4000 mAh

कॅमेरा आणि किंमत

Nokia C12 Plus या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये LED फ्लॅशलाइट देण्यात आलिया आहे. मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे.

या स्मार्टफोनची किंमत कंपनीकडून खूपच कमी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ७९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. त्यामुळे पैशांची चांगली बचत होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe