Ola Upcoming Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करत आहेत. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. आता ओला कंपनीकडून स्कूटरनंतर इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली जाणार आहे.
ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ही सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे. कंपनीने जबरदस्त रेंज आणि स्मार्ट लूक स्कूटरला दिल्याने ग्राहकांनीही या स्कूटरला चांगला प्रतिसाद दिला आहे.
आता ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या बाईकमध्ये काय नवीन फिचर देण्यात येणार तसेच सिंगल चार्जमध्ये किती किमीपर्यंत रेंज देणार असे अनेक प्रश्न आता ग्राहकांना पडले आहेत.
Ola ची इलेक्ट्रिक बाईक कधी होणार लॉन्च?
भारतात ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरने धुमाकूळ घातला आहे. तसेच सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे. मात्र आता कंपनीकडून नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली जाणार आहे.
ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की ओला 2026 इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करेल. यासोबतच त्यांनी सांगितले की, या वर्षी म्हणजे 2024 मध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देखील पाहायला मिळेल.
ओला कंपनीकडून आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर २०२४ पर्यंत लॉन्च केली जाणार आहे. इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी कंपनीकडून नवीन फीचर्ससह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणार आहे.
नवीन इलेक्ट्रिक बाईकमध्ये ADAS तंत्रज्ञान आढळू शकते
ओलाच्या या नवीन इलेक्ट्रिक बाइकमध्ये तुम्ही ADAS तंत्रज्ञान पाहू शकता. त्याच वेळी, या सर्व बाइक्समध्ये सुमारे 3 राइडिंग मोड्स दिसू शकतात.
आगामी बाइकच्या रायडिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर एका रिपोर्टनुसार, या सर्व बाइक्समध्ये सुमारे 150 ते 200 किमीची रेंज पाहायला मिळेल.
यासोबतच फास्ट चार्जिंगची सुविधाही दिली जाईल, ज्यामुळे कमी वेळेत चार्ज करता येईल. सामान्य चार्जरच्या मदतीने तुम्ही ते तुमच्या घरीही चार्ज करू शकाल.