Old Cooler Tricks : जुना कुलर देईल बर्फासारखी थंड हवा, फक्त वापरा या टिप्स घर होईल एकदम थंडगार…

Published on -

Old Cooler Tricks : देशात सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. या दिवसांत मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण बाजारात नवीन कुलर आणि एसी खरेदी करण्यासाठी जात असतात. मात्र जर तुमच्याकडे जुना कुलर असेल तर काही तापास वापरून तुम्ही बर्फासारखी थंड हवा मिळवू शकता.

उन्हाळ्यामध्ये अनेकजण जुने कुलर किंवा एसी बाहेर काढत असतात. मात्र त्यामधून थंडगार हवा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण नवीन एसी किंवा कुलर खरेदी करण्याचा विचार करत असतात. मात्र जरा थांबा कारण काही टिप्स वापरून तुम्ही थंडगार हवा मिळवू शकता.

जर तुमचाही कुलर थंड हवा देत नसेल तर अशा काही 5 टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमचा कुलर एकदम थंड हवा मारेल. त्यामुळे तुमचे नवीन कुलर घेण्याचे पैसे देखील वाचतील .

उन्हात कूलर ठेवू नका

काही जण अनेकदा कुलर उन्हात ठेवत असतात. अनेकांना वाटते की गरम हवा थंड हवेत बदलेल. पण उन्हामध्ये कुलर ठेवल्याने असे होत नाही. घरामध्ये कुलर अशा ठिकाणी ठेवा जेथे सूर्यप्रकाश येणार नाही. सावलीत कुलर ठेवल्याने हवा देखील थंड येते.

कुलरभोवती थोडी जागा द्या

तुम्ही घरामध्ये कुलर ठेवत असताना अनेक प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी कुलर ठेवत असाल तर तुमचा कुलर थंड हवा देणार नाही. कारण कुलर हा मोकळ्या जागेत ठेवावा लागतो. जेणेकरून कुलर बाहेरील हवा आत घेऊन ती थंड करून तुम्हाला दिली जाईल.

वायुवीजन आवश्यक आहे

जर तुम्ही घरामध्ये कूलर वापरत असाल तर खोलीत वेंटिलेशन असणे आवश्यक आहे. जर वायुवीजन नसेल तर खोलीत आर्द्रता तयार होते. हवा बाहेर पडल्यावरच कूलर थंडावा देईल.

गवत बदलत रहा

कुलरच्या आजूबाजूला अनेकदा तुम्ही गवत पहिले असेल. या गवतावर अनेकदा धूळ बसते त्यामुळे हवा आतमध्ये जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात किमान दोन वेळा तरी गवत बदलणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News