Electricity Bill : हिवाळा आणि उन्हाळ्यात सर्वाधिक विजेचा वापर केला जातो. हिवाळ्यात रूम हिटर, गिझर वापर अधिक केला जातो तर उन्हाळ्यामध्ये एसी,टीव्ही यांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे घरातील वीजबील अधिक येत असते.
वीजबिल जास्त आल्याने पैसेही अधिक जातात. त्यामुळे अनेकजण वीज जपून वापरत असतात. तसेच उन्हाळ्यात वीज गळतीचे प्रमाणही अधिक असते. काही वेळा घरातील वीजही जाते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/01/ahmednagarlive24-Electricity-Bill.jpeg)
घरातील वीज गेल्यानंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चार्जिंग करण्यासाठी आणि अनेक कारणांसाठी तुम्हाला वीज नसल्यावर समस्या निर्माण होतात.
आता वीज गेल्यानंतरही तुम्हाला वीज समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कारण बाजारात अशी अनेक उपकरणे उपलब्ध झाली आहेत. ती खरेदी करून तुमच्या घरात २४ तास वीज आपलब्ध असू शकते. तसेच वीजबिलही येणार नाही.
EnjoyCool 1,200 W 11-in-1 असे या पॉवर स्टेशनचे नाव आहे. थोडक्यात हे डिव्हाईस जनरेटर सारखे काम करते. लाईट नसल्यावर तुम्हाला लाईट पुरवण्याचे काम हे डिव्हाईस करते.
तसेच या डिव्हाइसचे वजनही खूप कमी आहे. तुम्ही कुठेही जाताना हे डिव्हाईस घेऊन जाऊ शकता. कुठेही आणि सहज घेऊन जात येत असल्याने या डिव्हाइसला बाजारात खूप मागणी आहे.
तपशील
या पॉवर स्टेशनला 1,008 Wh बॅटरी देण्यात आली आहे. या पॉवर स्टेशनची वीज पुरवण्याची क्षमताही अधिक आहे. एक दिवसभर चालेन असे परिपूर्ण डिव्हाईस बनवण्यात आले आहे.
घरी चार्ज करून लाईट नसलेल्या वेळी तुम्ही याचा वापर करू शकता. तसेच इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही हे डिव्हाईस चार्ज करू शकता. याच्याद्वारे एसी, टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन, ड्रोन, प्रोजेक्टर यांसारख्या गोष्टी चालू शकतात.
किंमत
EnjoyCool 1,200 W 11-in-1 पॉवर स्टेशनची किंमत $690 (56,120) आहे. हे डिव्हाईस अमेरिकेत लॉन्च करण्यात आले असून मार्चमध्ये याची विक्री सुरू होऊ शकते.
वैशिष्ट्ये
EnjoyCool 1,200 W 11-in-1 पॉवर स्टेशनमध्ये दोन 1,200 W AC आउटलेट्स, 120 W 12 V कार चार्जर, 65 W USB-C, 18 W USB-A आणि दोन 5 V USB-A पोर्ट समाविष्ट आहेत.
पॉवर स्टेशनला LED लाइट मिळतो आणि बॅटरी कमी असताना SOS सिग्नल देखील दाखवतो. डिव्हाइसमध्ये बॅटरी व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध आहे, जी जास्त चार्ज, ओव्हर टेम्परेचर आणि ओव्हरव्होल्टेज यासारख्या गोष्टींपासून संरक्षण करते. त्याचे वजनही केवळ 11 किलो आहे.