Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने शत्रूंना चोख प्रत्युत्तर; पाहा राफेल, SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांची खरी ताकद

Published on -

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत पहलगामचा बदला घेतलाय. 7 मे 2025 रोजी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हल्ला केला, जो पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी छावण्यांवर करण्यात आला. या हल्ल्याचा उद्देश पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहशतवादी छावण्या नष्ट करणे होता.

भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी या ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रांचा वापर करून, या हल्ल्याद्वारे दहशतवादी ठिकाणांवर अचूकपणे हल्ला केला गेला. ह्या दोन्ही क्षेपणास्त्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि ते विविध टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. चला, या क्षेपणास्त्रांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

स्कॅल्प क्षेपणास्त्र:

SCALP ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत, जी बंकर, कमांड सेंटर किंवा जड संरचनांवर अचूक मार करण्यासाठी डिझाइन केली आहेत. ह्या क्षेपणास्त्रांचा वेग आणि टार्गेटवर अचूक फटका देण्याची क्षमता ही अशा ऑपरेशनसाठी अमूल्य ठरते. ऑपरेशन सिंदूरमध्ये SCALP ने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली.

हॅमर क्षेपणास्त्र:

HAMMER क्षेपणास्त्रं मध्यम पल्ल्याची असून त्यांचा उपयोग हलत्या किंवा गुंतागुंतीच्या टार्गेटवर अचूक हल्ला करण्यासाठी होतो. ही क्षेपणास्त्रं GPS, इन्फ्रारेड इमेजिंग, आणि लेसर मार्गदर्शन प्रणालींसह सज्ज असतात, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत विश्वासार्ह ठरतात.

कामीकाझे ड्रोन:

स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रांच्या सोबतीला, कामिकाझे ड्रोनही वापरण्यात आले होते. हे ड्रोन टार्गेटच्या निरीक्षणासाठी आणि ओळखण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे ड्रोन टार्गेट ओळखून त्यावर थेट झेप घेतात आणि आत्मघाती पद्धतीने स्फोट घडवून हल्ला करतात. हे ड्रोन स्वयंचलित किंवा मानवी नियंत्रणात कार्य करतात, जे युद्धात अचूकता आणि वेळेवर निर्णय घेण्यास मदत करतात.

ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय हवाई दलाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, भारत शांततेचा समर्थक असला, तरी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास तो नेहमी तयार आहे. पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe