पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तर बरळला ; ‘आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू’

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. तो त्याच्या वादग्रस्त बोलण्याने अनेकदा टीकेचा मानकरीही झाला आहे.

याने पुन्हा एका भारताविरोधात गरळ ओकली आहे. ‘आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू,’ असं विधान अख्तरनं केलं आहे.

समा टीव्हीशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. सध्या त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना तो म्हणतो, ‘आमच्या पवित्र पुस्तकात ‘गजवा-ए-हिंद’चा उल्लेख आहे.

‘गजवा-ए-हिंद’चा अर्थ ‘भारताविरोधात पवित्र युद्ध’ असा होतो. नदी दोनदा रक्तानं लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील.

हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला आहे,’ असं अख्तरनं मुलाखतीत म्हटलं आहे. लोकांनी याबद्दल वाचन करावं असं तुम्हाला वाटतं का?, असा प्रश्न समा टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेनं अख्तरला विचारला.

त्यावर ‘हो, त्यानंतर तिथून शमल मशरिक निघेल. त्यानंतर आपण काश्मीर फत्ते करून पुढे मार्गक्रमण करू,’ असं उत्तर त्यानं दिलं.