Pan Card Update : पॅनकार्डधारकांनो आताच करा हे काम, अन्यथा होईल 10 हजार दंड आणि 1 वर्षाचा तुरुंगवास

Ahilyanagarlive24 office
Published:

Pan Card Update : केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकाला पॅन कार्ड आणि आधारकार्ड अनिवार्य केले आहे. पण त्यासंबंधी सरकारकडून वेळोवेळी अनेक नियम बदलले जात आहेत. आता पुन्हा एकदा सरकारकडून नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे.

सरकारकडून पॅनकार्ड संबंधित एक महत्वाचे अपडेट दिले आहे. जर तुम्हीही पॅनकार्डसंबंधित जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास सरकारकडून तुम्हाला मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते.

जर पॅनकार्डसंबंधित सरकारने सांगितलेले महत्वाचे काम केले नाही तर तुम्हाला 10000 दंड आणि 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने जारी केलेल्या सूचना पहा.

आता डिजिटल युगामुळे सरकारकडून सर्वांना पॅनकार्ड आणि आधारकार्ड अनिवार्य केले आहे. तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात पॅनकार्ड आणि आधारकार्ड महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करणे गरजचे आहे.

आधार कार्ड पॅनशी लिंक करावे लागेल

सरकारकडून गेल्या काही दिवसांपूर्वी पॅनकार्ड आधारकार्ड संबंधित एक नियम जारी केला आहे. पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच यासाठी अनेकवेळा सरकडून मुदत देखील वाढवण्यात आली आहे.

आयकर कायद्याच्या या नवीन नियमाचे उल्लंघन केले तर तुम्हाला सरकारकडून 10000 रुपयांचा दंड आकारला जाईल. यासोबतच कारवाई करताना 1 वर्षासाठी तुरुंगातही जाऊ शकते.

आधारशी पॅन लिंक कसे करावे

आधारशी पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला प्रथम टॅक्स ई-फायलिंगच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पॅन क्रमांक द्यावा लागेल.
तुम्ही तुमची यूजर आयडी पासवर्ड जन्मतारीख टाकून पोर्टलवर लॉग इन करू शकता.
एक नवीन पॉपअप विंडो दिसेल जिथे तुम्हाला पॅनला आधारशी लिंक करण्याचा पर्याय मिळेल.
यानंतर, तुम्हाला उर्वरित तपशील काळजीपूर्वक वाचावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe