Pan Card Update: सरकारची मोठी घोषणा! आता पॅन कार्डधारकांच्या अडचणीत होणार वाढ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Published on -

Pan Card Update:  जर तुम्ही देखील पॅन कार्डधारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता पॅनकार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करण्यासाठी जास्त वेळ शिल्लक नाही ज्यामुळे आता अनेकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जर तुम्ही वेळीच आधार कार्डसोबत पॅन लिंक केला नाहीतर तुमच्यावर दंडासह कायदेशीर कारवाई होऊ शकते.

पॅन कार्डधारकांना भरावा लागणार मोठा दंड

आयकर विभागाने 30 जून 2023 ही आधार कार्डशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला 10,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल. एवढेच नाहीतर तुमचे पॅनकार्ड 1 जुलै 2023 पासून रद्द केले जाईल. यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामे मध्यभागी लटकतील.

तर दुसरीकडे आधार कार्डसोबत पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे, ती आता शेवटची संधी असू शकते. लिंकिंगसाठी तुम्हाला जास्त शुल्क देखील सध्या भरावे लागणार नाही. हे जाणून घ्या कि तुम्ही तुमचे पॅन कार्ड घरी बसून ऑनलाईन पद्धतीने देखील आधार कार्डशी लिंक करू शकतात.

पॅनकार्डधारकांना 6 महिने तुरुंगवास भोगावा लागणार  

तुम्ही दोन पॅन कार्ड वापरत असाल तर एक सहज सरेंडर करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. सरकारने दोन पॅनकार्ड वापरणे बेकायदेशीर ठरवले आहे  त्यासाठी तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर या चुकीसाठी तुम्हाला 6  महिने तुरुंगात जावे लागू शकते.

हे पण वाचा :- Dating Apps पासून सावधान! प्रेम प्रकरण पडणार भारी, फसवणुकीचा ‘हा’ नवीन प्रकार जाणून वाटेल आश्चर्य

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News