Panjab Dakh Havaman Andaj : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये १० मे रोजी कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा इशारा

Ahmednagarlive24 office
Updated:

Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात खूपच बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अगोदरच अवकाळी पाऊस पडला आहे. तसेच आता पंजाब डख यांच्याकडून  पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब डख यांच्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाब डख यांच्याकडून सातारा, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये १० मे रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

आता पुन्हा एकदा पंजाब डख यांच्याकडून अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. जर असाच अवकाळी पाऊस पडत राहिला तर त्याचा परिणाम मोसमी पावसावर होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पंजाब डख यांच्याकडून २०२३ या वर्षीदेखील २०२२ सारखा चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही.

सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पण आता पंजाब डख यांच्याकडून १० मे रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाळ्या सारखा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या १० मे रोजी माळशिरस, सोलापूर, पुणे, पंढरपूर, अकलूज, लातूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा पंजाब डख यांच्याकडून देण्यात आला आहे.

तसेच १७ मे पासून पुन्हा एकदा पंजाब डख यांच्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe