फक्त 45 हजारांत पशुपतीनाथ मंदिर, बौद्धनाथ स्तूप आणि बरंच काही, IRCTC चं नेपाळ टुर पॅकेज एकदा बघाच!

IRCTC ने अगदी कमी खर्चात नेपाळसारख्या स्वर्गीय ठिकाणी जाण्याची संधी दिली आहे, ज्यात निसर्गदृश्ये, मंदिरदर्शन आणि उत्कृष्ट सोयी सुविधा मिळणार आहेत. हा टुर प्लॅन नेमका कसा असले, याचे शुल्क किती असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात-

Updated on -

IRCTC Nepal Tour | नेपाळसारख्या सुंदर देशाला भेट देण्याचे तुमचे स्वप्न आता सहज शक्य होणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने मुंबईहून सुरू होणाऱ्या कमी खर्चाच्या टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या टूरचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत नेपाळच्या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये काही दिवस रम्य वेळ घालवू शकता. IRCTC ने हे पॅकेज विशेषतः सामान्य प्रवाशांच्या बजेटमध्ये बसावे यासाठी आखले आहे.

टुर पॅकेजबद्दल माहिती

या पॅकेजचे नाव “Mystical Nepal Package Ex Mumbai” असून याचा कोड WMO 018 आहे. टूर 5 रात्री आणि 6 दिवसांचा असून पहिली ट्रीप 14 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत तर दुसरी ट्रीप 7 मे ते 12 मे दरम्यान होणार आहे. प्रवासादरम्यान मुंबईहून काठमांडूसाठी विमानसेवा पुरवण्यात येणार आहे.

या सहलीत पशुपतीनाथ मंदिर, बौद्धनाथ स्तूप, दरबार स्क्वेअर, स्वयंभूनाथ स्तूप, मनोकामना मंदिर, पोखराच्या डेव्हिल्स फॉल्स आणि गुप्तेश्वर महादेव गुहा यासारखी ठिकाणे पाहण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त सुरंगकोट, बिंध्यवासिनी मंदिर आणि तिबेटी शरणार्थी केंद्रालाही भेट दिली जाईल. निसर्गप्रेमींसाठी हे स्थळ म्हणजे पर्वणीच आहे.

सुविधा-

या टूरमध्ये प्रवाशांसाठी नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण आणि वाहतुकीची सुविधा दिली जाईल. तसेच काठमांडू आणि पोखरा येथे निवासाची व्यवस्था केली जाईल. सर्व प्रवाशांना प्रवास विमा देखील मिळेल.

पॅकेजची किंमत ₹46,600 पासून सुरू होते. सिंगल ऑक्युपन्सीसाठी ₹54,930, डबल ऑक्युपन्सीसाठी ₹46,900 आणि ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी ₹46,600 एवढं भाडं निश्चित करण्यात आलं आहे. बुकिंग करण्यासाठी www.irctctourism.com या IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News