Name Astrology : आजकालही अनेकजण ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असतात. कोणतेही शुभकार्य करायचे असेल तर ते ज्योतिषशास्त्र पाहतात आणि त्यानंतरच पुढील कार्य करतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही अक्षरांनी सुरु झालेल्या नावाच्या लोकांचे हृदय नेहमी साफ असते.
तसेच अशा लोकांच्या जीवनात नावाचा देखील खूप प्रभाव पडत असतो. नावाने व्यक्तीची ओळख होत असते. जर नाव नसते तर व्यक्तीची ओळख ही अपूर्णच असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, गुण आणि राशी वेगवेगळी असतात.
तसेच प्रत्येकाचे नाव वेगवगेळे असते. प्रत्येकाच्या नावाचा अर्थ वेगळा असतो. ज्योतिष शास्त्रातही नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचे भविष्य आणि त्याचा स्वभाव याबद्दल सर्व काही सांगितले जाते.
जर तुम्हालाही तुमच्या राशीबद्दल माहिती नसेल आणि तुमच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरूनच जाणून घेऊ शकता.
ज्या लोकांचे नाव ‘या’ या अक्षराने सुरु होते अशा लोकांचे मन अगदी स्वच्छ असते. पण असे लोक खूप आळशी असतात. तसेच या अक्षराचे लोक खूप हट्टी असतात. पण जेव्हा गरज असते तेव्हा हे लोक खूप कष्ट घेतात आणि यश मिळवतात.
‘या’ नावाचे लोक त्यांच्या गुण-दोषांसाठी ओळखले जातात. जरी हे लोक स्वच्छ मनाचे मानले जातात. पण हे लोक कुणालाही आपले मन सांगू शकत नाहीत. या लोकांना स्वातंत्र्याच्या विचारात राहायला आवडते. त्यांना जे करायला आवडते ते ते तिथे करतात.
त्यांना दुसऱ्याच्या बोलण्यात अजिबात आवडत नाही. हे लोक हट्टी मानले जातात. त्यांना रागही खूप लगेच येत असतो. त्यांच्या रागामुळे ते इतर लोकांना दुखावतात. हे लोक थोडे आळशी मानले जातात.
अडचणीच्या काळात हे लोक धैर्य ठेवतात. तसेच ज्याठिकाणी त्यांना यश मिळवायचे आहे अशा ठिकाणी ते मेहनत घेतात आणि सहजपणे यश मिळवत असतात. तसेच हे लोक खूप प्रेमळ देखील असतात.