International Day Of Happiness : तणाव कमी करायचा आहे? तर या 5 प्रकारे स्वतःला ठेवा आनंदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

International Day Of Happiness : प्रत्येकाला जीवन आनंदाची जगायचे असते. मात्र मानवाच्या जीवनातील काही गोष्टी त्यांना आनंदाने जगू देत नाहीत. मानवाला जीवनात सुख, शांती आणि पैसे सर्वकाही हवे असते. यासाठी त्याला अथक परिश्रम करावे लागतात.

पण मानवी जीवनात हवी असलेली गोष्ट मानवाकडे नसेल तर तो कधीच समाधानी होत नाही. त्यामुळे तो सतत तणावाखाली जात असतो. तणावाखाली गेलेल्या व्यक्ती अनेकदा चुकीची पाऊले उचलत असतात. मानवी जीवनात आनंद नसेल तर जीवन जगण्यात काही अर्थ नसतो.

मानवी जीवनात आनंदाचा अर्थ समजून सांगण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने दर 20 मार्चला आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आजही आनंद दिन आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याच्या ५ गोष्टी सांगणार आहोत.

आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी अस्तित्वात आला?

२० मार्च हा दिवस आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केला आहे. १२ जुलै २०१२ रोजी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या दिवशी लोकांना आनंदाचे महत्व आणि त्याविषयी जागरूकता याबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात.

प्रसिद्ध परोपकारी जिमी एलियन यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांना प्रेरणा मिळाली आणि हा दिवस अस्तित्वात आला. या प्रयत्नांनंतर 20 मार्च 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित करण्यात आला.

स्वतःला असे ठेवा आनंदी

स्वतः मजा करा

जर तुम्हालाही जीवनात स्वतःला आनंदी ठेवायचे असेल तर स्वतःमध्ये आनंद शोधा. तुम्हाला आवडतील अशा गोष्टी करा. मात्र हे करत असताना दुसऱ्याला दुःख होऊ नये याची नक्की काळजी घ्या. जुन्या मित्रांना भेटणे, खेळ पाहणे, लांब आंघोळ करणे, नृत्य करणे, आपले आवडते पदार्थ खाणे, संगीत ऐकणे यासारख्या छोट्या गोष्टी असू शकतात.

प्रियजनांशी संवाद

स्वतःला जीवनात आनंदी ठेवायचे असेल तर स्वतःच्याच आयुष्यात आनंद शोधण्यात व्यस्त व्हा. तसेच तुमच्या प्रियजनांशी तुम्ही संवाद साधून तुम्ही जीवनात आनंदी राहू शकता.

व्यायाम

आपले शरीर निरोगी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. दररोज व्यायाम केल्याने तुमचे शरीर सुदृढ राहील आणि तुम्हाला आनंदी वाटेल. तुम्हाला आवडेल असा व्यायाम तुम्ही निवडू शकता.

पूर्ण झोप

आयुष्याच्या धावपळीत आपण इतके व्यस्त झालो आहोत की अनेकवेळा कामाच्या टेन्शनमुळे आपल्याला नीट झोप लागत नाही. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, ज्याचा परिणाम आपल्या जीवनातील आनंदावरही होतो.

प्रत्येक व्यक्तीसाठी किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे कारण शरीराला पुरेशी विश्रांती मिळून मन योग्यरित्या कार्य करते आणि त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहता आणि तणाव न होता व्यक्ती आनंदी राहते.

काहीतरी नवीन शिका

प्रत्येक्जण आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी तुम्ही करताच राहा. मात्र इतर नवनवीन गोष्टी देखील करा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. आवडीच्या गोष्टी केल्याने जीवनात नक्कीच आनंद मिळेल.