Petrol Diesel Price Today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याचे परिणाम देशातील वाहतुकीवर होताना दिसत आहेत. आज बुधवारी 5 एप्रिल 2023 साठी देखील भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
पेट्रोल-आणि डिझेलची दरवाढ पाहता सर्वसामान्य नागिरकांना मोठा आर्थिक झटका बसत आहे. तसेच आता मात्र ३१७ दिवसांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. कारण 317 दिवसांपासून पेट्रोल-आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशातील मुख्य शहरात आज हे आहेत दर
दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
हैदराबाद -पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू – पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम – पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर – पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर – पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
ही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आहे
गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
तेजीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $80 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $85 च्या जवळ पोहोचले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या होत्या. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झालेली नाही.
21 मे 2022 रोजी उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली
21 मे 2022 रोजी काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला होता. सध्या पेट्रोल शंभरीच्या पुढे आणि डिझेल शंभर रुपयांच्या आसपास आहे.