PM Kisan : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार 14 व्या हप्त्याचा लाभ, त्वरित करा हे काम

Published on -

PM Kisan : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकरकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे देशातील करोडो शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे.

पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा या योजनेमागचा उद्देश आहे.

पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने ३ हफ्त्यांमध्ये दिली जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हफ्ते हफ्ते देण्यात आले आहेत.

देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. नुकताच शेतकऱ्यांना १३ वा हफ्ता देण्यात आला आहे. आता शेतकरी १४ व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. २००० रुपयांच्या हफ्त्याने हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात.

या शेतकऱ्यांना मिळत नाही लाभ

सरकारकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच या योजेनबाबत सरकारकडून अनेकदा बदल केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी भाडेतत्वावर जमीन घेतली आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही अशा शेतकऱ्यांना देखील लाभ दिला जाणार नाही. या योजेनसाठी पात्र असण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.

डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वास्तुविशारद, वकील अशा व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत आणि त्यांना १० हजार पेक्षा पेन्शन आहे असे कर्मचारी देखील यासाठी पात्र नाहीत.

तुम्हाला 14 व्या हप्त्याचा लाभ मिळेल का?

जर तुम्ही 14 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची स्थिती तपासावी लागेल. हे तुम्ही घरी बसूनही करू शकता. यावरून तुम्हाला 14 व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळतील की नाही हे समजेल.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या PM किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. यानंतर, ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा योजनेशी जोडलेला 10 अंकी मोबाइल क्रमांक टाका.

यानंतर, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या समोर स्क्रीनवर स्टेटस दिसेल. पैसे येतील की नाही हे या स्टेटसवरून कळू शकते.

यानंतर, तुम्हाला e-KYC, पात्रता आणि जमीन बीजन यांच्या पुढे काय संदेश लिहिलेला दिसतो. ते तपासावे लागेल. या तिघांपैकी कोणत्याही एकासमोर ‘नाही’ लिहिले तर तुम्हाला 14व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

दुसरीकडे, तिन्हींसमोर होय लिहिल्यास, तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News