PM Modi : ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याचा फोन, दिल्लीत उडाली खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:

PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. यामुळे कसून तपास केला जात आहे.

तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीने केला. 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्रीचा हा प्रकार आहे. निवासस्थानात अनेक ठिकाणी हे बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा त्या व्यक्तीचे केला आहे. यानंतर तातडीने पंतप्रधानांच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले.

तसेच या प्रकारानंतर सुरक्षेत कोणतीही कमी ठेवली जात नाही. बॉम्ब विरोधी पथकाने सगळीकडे तपासणी केली आहे. यामध्ये काहीही हाती लागले नाही. फोन करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. दिल्लीच्या दयालपूर भागातला हा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

या व्यक्तीचे नाव रवीद्र तिवारी असे आहे. तिवारीचा मोठा भाऊ तीन वर्षे बेपत्ता आहे. त्याच्या पत्नीचे इतर कोणाशी संबंध असल्याचाही त्याला संशय आहे. यामध्ये पोलीस काहीच करत नसल्याने त्याने खळबळ उडवून देण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगितले. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून हा फोन करणाऱ्याचा शोध सुरु होता. अखेर या आरोपीचा मोबाईल नंबर सापडला, त्याला ट्रॅक करून पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe