PMSYMY : भन्नाट योजना! फक्त ५५ रुपये जमा करा आणि ३६,००० रुपये पेन्शन मिळवा, अशी करा नोंदणी

Ahmednagarlive24 office
Published:

PMSYMY : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी आणि असंघटित कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होतच आहे मात्र त्यासोबतच असंघटित कामगारांना देखील त्याचा फायदा होत आहे.

केंद्र सरकारकडून असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनांमधून शेतकरी आणि असंघटित कामगारांना आर्थिक मदत दिली जाते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची मदत देते. तसेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही शेतकरी आणि मजुरांसाठी पेन्शन योजना आहे. या अंतर्गत, 60 वर्षांनंतर लाभार्थींना दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36000 रुपये पेन्शन दिली जाते.

प्रीमियम दरमहा भरावा लागेल

जर शेतकरी आणि असंघटित कामगारांना केंद्र सरकारच्या अशा योजनांमधून पेन्शन मिळवायची असेल त्यांना दरमहा पैसे भरावे लागतील. वयानुसार 55 ते 200 रुपये भरावे लागतील. नोंदणी दाराचे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाईल. सरकारकडून 31 मे 2019 रोजी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेत तुम्ही जमा केलेल्या पैशाइतकेच पैसे सरकारकडून जमा केले जातात. त्यामुळे जर तुम्ही अशा योजनांमध्ये पैसे जमा केले तर तुम्हाला वृद्धापकाळात त्याचा आधार होऊ शकतो.

असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात

या योजनेसाठी पात्र उमेदवार ठरवण्यात आले आहेत. या योजेनचा लाभ फक्त असंघटित कामगार आणि मजूर घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षे असावे. जर तुम्ही आयकर भरला किंवा EPFO, NPS आणि ESIC चे सदस्य असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

१८ ते ४० वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
त्यासाठी २ हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असावी.
55 ते 200 रुपयांपर्यंतचे मासिक योगदान शेतकऱ्याच्या वयानुसार द्यावे लागेल.
वयाच्या 18 व्या वर्षी सामील होणार्‍या शेतकर्‍यांना 55 रुपये मासिक योगदान देय असेल.
जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 110 रुपये जमा करावे लागतील.
तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील झाल्यास, तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

नोंदणी कशी करावी

जर तुम्हालाही केंद्र सरकारच्या पीएम श्रम योगी मानधन योजनेत नोंदणी करायची असेल तर तुम्हाला जवळच्या CSC म्हणजेच लोकसेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागेल. तुम्ही किसान मानधन योजनेच्या https://maandhan.in/sramyogi या वेबसाइटला भेट देऊनही तुमची नोंदणी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe