New Yamaha RX100 : 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक यामाहा RX100 नवीन रूपात होणार लॉन्च, जाणून घ्या सर्वोत्तम मायलेज आणि फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

New Yamaha RX100 : ९० च्या दशकात तरुणांसह अनेकांना वेड लावणारी बाईक यामाहा RX100 आता पुन्हा एकदा नवीन रूपात लॉन्च होणार आहे. त्यामुळे तरुणांना पुन्हा एकदा यामाहा RX100 बाईक खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

यामाहा कंपनीकडून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे. ९० च्या दशकात अनेकजण बुलेट पेक्षा यामाहा RX100 बाईकला अधिक पसंती देत होते. पण काही कारणामुळे या बाईकचे उत्पन्न भारतामध्ये थांबवण्यात आले.

आता पुन्हा एकदा नवीन Yamaha RX100 बाजारात आणण्याची तयारी कंपनी करत असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन इशिन चिहाना यांनी दिली आहे. आता बाईक मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. बाईकमध्ये जबरदस्त इंजिन आणि आणि नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत.

Yamaha RX100 मध्ये कोणते बदल होणार?

कंपनीकडून Yamaha RX100 बाईकमध्ये डिझाईन आणि आवाजामध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच अनेक नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा Yamaha RX100 या बाईकला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

RX100 इंजिन

यामाहा RX100 बाईकमध्ये दमदार इंजिन वापरण्यात येणार आहे. जुन्या Yamaha RX100 बाईकमध्ये 2-स्ट्रोक इंजिन होते, जे कदाचित BS6 फेज 2 उत्सर्जन नियमांची पूर्तता करत नाही. त्यामुळे आता नवीन यामाहा RX100 मध्ये मोठे इंजिन दिसणार आहे.

RX100 डिझाइन

जुन्या Yamaha RX100 आणि नवीन Yamaha RX100 मध्ये अनेक बदल करण्यात येणार आहे. नवीन Yamaha RX100 मॉडेलमध्ये नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत. तसेच इंजिन आणि डिझाईनमध्ये बदल होणार आहे.

नवीन यामाहा RX100 वैशिष्ट्ये

या RX100 बाइकमध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर आणि डिजिटल ट्रिप मीटर दिले जातील. याशिवाय तंत्रज्ञानावर आधारित काही नवीन फिचर्स जोडले जाऊ शकतात. जसे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पॉइंट देण्यात येणार आहे.

किंमत आणि कधी लॉन्च होईल?

कंपनीच्या माहितीनुसार Yamaha RX100 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. पॉवरफुल 250cc इंजिन बाईकमध्ये देण्यात येणार आहे. या बाईकची किंमत 1,49,000 कंपनीकडून ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe