7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! मोदी सरकारकडून लाखो कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजना, होणार आर्थिक लाभ

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून नवीन वर्षातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचारी महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. होळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार असल्याची चर्च होती मात्र होळीनंतरही त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

मात्र मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना दुसरीच भेट देण्यात आली आहे. फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स योजना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय कर्मचारी केंद्र सरकारकडून कोणत्याही सणानिमित्त १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.

लाखो कर्मचाऱ्यांना ही भेट मिळते

केंद्र सरकारकडून फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सरकारकडून १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये या पैशावर कर्मचाऱ्यांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.

हे पैसे खर्च करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरवर्षी लाखो कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाकडून ही भेट दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

पैसे परत करण्याच्या अतिशय सोप्या अटी

सर्वात आनंदाची बाब म्हणजे या आगाऊ रकमेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. या पैशाच्या परतफेडीच्या अटीही अतिशय सोप्या आहेत.

तुम्ही 10000 हजार रुपये 1000 रुपयांच्या सुलभ हप्त्यांमध्ये परत करू शकता, तेही व्याजाशिवाय. दरवर्षी फेस्टिव्हल अॅडव्हान्स योजनेंतर्गत सरकारकडून कर्मचाऱ्यांना पैसे दिले जातात.

पाच हजार कोटींची तरतूद केली

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत चार ते पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अॅडव्हान्स योजनेचे बँक चार्जेसही सरकार उचलत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आगाऊ मिळालेले हे पैसे कर्मचारी डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतात. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एलटीसी कॅश व्हाउचर योजनेसारख्या सुविधा मिळत होत्या. या योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांना प्रवास भत्त्याच्या बदल्यात मिळणारी रोख रक्कम बाजारात प्रसारित केली जाईल.

महागाई भत्ता वाढ झाली नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अजूनही वाढ करण्यात आलेली नाही. दरवर्षीं २ वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. मात्र या २०२३ वर्षात अजूनही कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe