Ration Card: जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज केंद्र आणि राज्य सरकार रेशन कार्ड धारकांसाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.
यामुळे देशातील लाखो लोकांना मोठा फायदा होताना दिसत आहे. मात्र काही लोक अपात्र असून देखील या योजनांचा फायदा घेताना दिसत आहे. यामुळे आता शासन रेशनकार्ड यादीतून अपात्र लोकांची नावे काढून टाकत आहे. त्यासाठी सरकार नवी यादी जाहीर करणार आहे.
जर तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही रेशनकार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यादीत तुमचे नाव तपासू शकता. जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये फक्त पात्र लोकांचीच नावे असतील. तुम्ही पात्र असाल पण यादीत नाव नसेल तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता.
यानंतर लवकरच नवीन रेशनकार्ड यादी जारी करण्यात येणार आहे. यावेळी अन्न विभागाने गावानुसार यादी जाहीर केली आहे. त्यात पात्र लोकांची नावे आहेत. या यादीतून अपात्र लोकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि तुम्हाला रेशन दुकानातून कोणत्याही अडचणीशिवाय रेशन मिळवायचे असेल तर तुमची पात्रता तपासा. त्यासाठी यादी जारी करण्यात आली आहे.
रेशनकार्ड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे
सर्वप्रथम यासाठी रेशन कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर अधिकृत वेबसाइटच्या मेनूमध्ये रेशन कार्डचा पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचे राज्य निवडा.
आता ग्रामीण आणि शहरी पर्याय निवडा.
यानंतर तुमच्या शहराचा ब्लॉक निवडा.
यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा.
ग्रामपंचायतीचे नाव निवडल्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा.
आता तुमच्या गावाच्या रेशनकार्डची यादी तुमच्या समोर येईल.
यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता.
हे पण वाचा :- Today Weather Update : नागरिकांनो सर्तक रहा, ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स