Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर! आता गहू-तांदुळासोबत मिळणार या वस्तू, सरकारचा आदेश जारी

Ahmednagarlive24 office
Published:

Ration Card : रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कारण आता गहू आणि तांदुळासोबत आणखी काही वस्तू दिल्या जाणार आहेत. याबाबत सरकारकडून आदेश देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना फायदा होणार आहे.

केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून गरीब नागरिकांना कमी दरात गहू आणि तांदूळ दिले जात आहे. त्यामुळे आता रेशनकार्ड धारकांना अतिरिक्त वस्तूंचा लाभ मिळणार आहे.

कोरोना काळापासून सरकारकडून शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. याचा फायदा देशातील करोडो नागरिकांना होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा मोफत धान्य वाटप करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

या वस्तू मोफत वाटण्याचा सरकारचा विचार

सध्या सरकारकडून शिधापत्रिका धारकांना गहू आणि तांदूळ मोफत दिले जात आहे. परंतु उत्तराखंड राज्य सरकार मोफत रेशन योजना 2023 शी संबंधित नागरिकांना गहू, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू देण्याचा विचार करत आहे. अशी महिती उत्तराखंडच्या अन्नमंत्र्यांनी दिली आहे.

ज्यामध्ये उत्तराखंड सरकार आपल्या राज्यातील 23 लाख कुटुंबांना विनामूल्य रेशन योजना 2023 अंतर्गत साखर आणि मीठ याशिवाय गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

65 लाख कोटींचा अतिरिक्त खर्च सरकारवर येणार आहे

माध्यमांशी संवाद साधताना अन्नमंत्र्यांनी सांगितले की, २०२४ पर्यंत सर्व नागरिकांना मोफत रेशन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच सरकारकडून नागरिकांना २०२३ या वर्षात मोफत रेशन सोबत आणखी वस्तू देण्याचा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, नागरिकांना मोफत रेषांसोबत अतिरिक्त वस्तू देण्यासाठी राज्य सरकार गहू आणि तांदूळ सोबत साखर आणि मीठ या जीवनावश्यक वस्तू देण्याचा विचार करत आहे. ज्या नागरिकांनी गेल्या ६ महिन्यांपासून रेषांचा लाभ घेतला नाही अशा नागरिकांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असल्याचेही अन्नमंत्र्यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe