Ration Card Update : रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! फटाफट करा हे काम अन्यथा मिळणार नाही रेशन

Ration Card Update : तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सरकारकडून मोठे अपडेट देण्यात आले आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना त्यानुसार काही काम करावे लागेल. अन्यथा त्यांना मोठे नुकसान होऊ शकते.

केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना रेशन योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच कोरोना काळापासून रेशन लाभार्थ्यांना मोफत रेशन दिले जात आहे. तसेच मोफत रेशन योजनेमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारकडून देशातील रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ २०२४ पर्यंत दिला जाणार आहे. त्यामुळे आता २०२४ पर्यंत मोफत रेशन योजना सुरु राहणार आहे.

सरकारकडून रेशन कार्डबाबत अनेक नवीन नियम जारी केले जात आहेत. त्यामुळे रेशन कार्डधारकांना या नियमांचे पालन करणे अनिवाय आहे. जे लाभार्थी सरकारच्या नियमांचे पालन कारण नाहीत अशा लाभार्थ्यांना मोठे नुकसान होईल.

हे काम लवकरात लवकर करा

सरकारकडून रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदुळासोबत इतर देखील फायदे दिले जात आहेत. जर तुम्हाला याचा लाभ घेईचा असेल त्याआधी आता तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी ३० जून २०२३ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

रेशन कार्डधारकांना हरियाणा सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. सरकारने केलेल्या बदलानंतर काही जिल्ह्यांमध्ये गरिबांना गव्हाऐवजी पीठ दिले जाणार आहे. मात्र, यासाठी त्यांना काही पैसे प्रति किलो मोजावे लागतील.

तुम्ही असे न केल्यास तुमचे नाव या लाभामधून काढून टाकले जाईल, त्यानंतर सरकारकडून तुम्हाला कोणतेही साहित्य दिले जाणार नाही. काही दिवसांपूर्वी नोटीस पाठवून आधार कार्ड आधारशी लिंक करण्याचे सांगण्यात आले आहे. असे न केल्यास पुढील रेषांचा लाभ दिला जाणार नाही.

दुसरीकडे, उपविभागीय अधिकारी अभिषेक पलासिया यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या सक्त सूचना असून, कार्डधारकांना कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत आधार सीडिंग करून घ्यावे लागेल. तसे न केल्यास त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकले जाईल.

15 दिवसांपर्यंत माहिती दिली जाईल

आता लोकांना जागरूक करण्यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या लाभार्थींनी त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले नाही त्यांना माहिती देण्यासाठी 15 दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकांना त्याचे फायदे आणि तोटे सांगितले जातील.