Redmi Note 12 Pro Series : रेडमीचे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. तसेच तरुणांमध्ये रेडमीच्या स्मार्टफोनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आता Xiaomi कंपनी आणखी एक जबरदस्त 5G स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे.
Xiaomi कंपनीकडून जागतिक बाजारपेठेत आणखी २ नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने प्रो सीरीजमधील २ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G या दोन फोनचा समावेश आहे.
भारतीय बाजारपेठेत हे दोन स्मार्टफोन लवकरच लॉन्च केले जाणार आहेत. दोन्ही फोन 120Hz AMOLED डिस्प्लेसह लॉन्च केले गेले आहेत, 120W पर्यंत फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
वैशिष्ट्ये
Xiaomi, Note 12 Pro 5G आणि Note 12 Pro Plus 5G च्या या सीरीजमध्ये येणाऱ्या फोनमध्येही हाच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 120Hz उच्च रिफ्रेश रेट, DCI-P3 कलर गॅमट आणि डॉल्बी व्हिजनसह 6.67-इंच POLED पॅनेलसह येतात.
तसेच दोन्ही उपकरणे MediaTek Dimensity 1080 चिपसेटद्वारे समर्थित आहेत. प्रो मॉडेल 67W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते तर Pro+ मॉडेल 120W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरासह बॅटरी देखील शक्तिशाली
Xiaomi कडून या दोन्ही स्मार्टफोनमध्ये उत्तम कॅमेरासह बॅटरी देखील दमदार देण्यात आली आहे. दोन्ही फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च करण्यात आले आहेत. प्रो मॉडेलमध्ये 50MP + 8MP + 2MP कॅमेरा समाविष्ट आहे.
तर, प्रो प्लस मॉडेलला 8-मेगापिक्सेल आणि 2-मेगापिक्सेल कॅमेरा 200-मेगापिक्सेल Samsung ISOCELL प्राइमरीसह मिळतो. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh देण्यात आली आहे.
किंमत
कंपनीकडून या दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीबद्दल देखील सांगण्यात आले आहे. Redmi Note 12 Pro ची किंमत EUR 399 म्हणजेच अंदाजे 35,52 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Redmi Note 12 Pro+ 5G ची किंमत EUR 499 म्हणजेच 44,428 ठेवण्यात आली आहे. लवकरच भारतात देखील हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.