Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा की वाढ? जाणून घ्या पेट्रोल पंपावर जाण्याआधी आजचे नवीनतम दर

Petrol Diesel Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. देशातील महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीय तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी 11 फेब्रुवारी साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर जाहीर केले आहेत. यामध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात.

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. २६३ दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा हा दर

देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वेगवेगळ्या आहेत. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे, तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे विकले जात आहे?

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेल दर

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe