RBI News : जर तुमचेही बँकेत खाते असेल आणि तुम्ही या आठवड्यात बँकेतून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतच्या अधिसूचना आरबीआयकडून जारी करण्यात आल्या आहेत.
बँकेत खाते असणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेने मोठा झटका दिला आहे. आता बँक खात्यातून ग्राहक ५००० रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू शकणार नाहीत. याबाबत आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. आरबीआयकडून काही बँकांवर बंदी घातली गेली आहे.
खात्यातून फक्त 5000 रुपये काढता येणार
देशात सध्या काही बँकांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आरबीआयने या बँकांवर निर्बंध घातले आहेत. त्यातही २ बँकांचे ग्राहक खात्यातून फक्त ५ हजार रुपये काढू शकतात.
कोणत्या बँकांवर बंदी आहे?
उर्वकोंडा सहकारी म्युनिसिपल बँक, उर्वकोंडा (अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) आरबीआयने या बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे काही मोजकेच पैसे बँकेतून काढता येऊ शकतात.
बँक कर्जही देऊ शकणार नाही
आरबीआयने निर्बंध लादलेल्या बँकेकडून आता कोणाला कर्जही मिळणार नाही. तसेच या बँकेमध्ये कोणीही कसल्याही प्रकारची गुंतवणूकही करू शकणार नाही. दोन्ही बँका कोणताही करार करू शकणार नाहीत किंवा त्यांची मालमत्ता विकू किंवा हस्तांतरित करू शकणार नाहीत.
आरबीआयने परिपत्रक जारी केले
आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात असे सांगण्यात आले आहे की, बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह सुरू ठेवतील. तर, HCBL सहकारी बँक, लखनौ (उत्तर प्रदेश), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि शिमशा सहकारी बँक रेग्युलर, मद्दूर, (कर्नाटक) यांच्या सध्याच्या रोख स्थितीमुळे या बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येणार नाही.
ग्राहकांना 5 लाख मिळतील
आरबीआयने म्हटले आहे की पाच सहकारी बँकांच्या पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असेल.