अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी काही नावे पाठवली आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याची तर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची शिफारस केली आहे.
एकाच वर्ल्ड कपमध्ये रोहितने पाच शतक ठोकून नवा इतिहास रचला. गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने 9 सामन्यात 649 धावा ठोकल्या. मात्र, रोहितला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा काढणारा सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड मोडता आला नाही.
रोहितला केवळ 25 धावा कमी पडल्या. भारताचा महान फलंदाज सचिनने 2003 वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानावर रोहित शर्माने देखील आतापर्यत आतापर्यंत अनेक कर्तब दाखवले आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये चार शतक ठोकणारा जगात तो एकमेव क्रिकेटपटू आहे. दुसरीकडे, भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन याच्या नावावर सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आहे.
या कामगिरीसाठी बीसीसीआयनं रोहित शर्माची खेलरत्नसाठी तर धवनची अर्जुन पुरस्कारासाठी केल्याची माहिती शनिवारी दिली.
यासोबत भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ वेगवान गेंदबाज इशांत शर्मा याचंही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे.
तसेच महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू दीप्ती शर्मा हिचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून दीप्ती वनडे आणि टी-20 मध्ये शानदार कामगिरी करत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews