Sachin Tendulkar Car Collection : सचिन तेंडुलकरकडे आहेत एकापेक्षा एक जबरदस्त कार, जाणून घ्या पहिल्या कारपासून सर्व कारची यादी

Ahmednagarlive24 office
Published:

Sachin Tendulkar Car Collection : देशातील क्रिकेटचे चाहते आजही सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल देशालाच नाही तर जगातील संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे.

आज तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगणार नसून तुम्हाला त्याच्याकडे असणाऱ्या एकापेक्षा एक जबरदस्त कारबद्दल सांगणार आहोत. सचिन तेंडुलकरला देखील वेगवेगळ्या कार खरेदी करण्याची खूप आवड आहे.

तुम्ही देशातील अनेक सेलिब्रिटींकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार पाहिल्या असतील. तसेच अनेकांना वेगवेगळ्या कार खरेदी करून त्यांचे कलेक्शन करणे आवडत असते. अशाच काही कार सचिनकडे देखील आहेत.

मारुती 800

सचिन तेंडुलकर यांच्याकडे सर्वात प्रथम मारुती 800 कार होती. मारुती 800 या कारचे उत्पादन जरी तरीही सचिन तेंडुलकरकडे ही कार आजही आहे. जुन्या आठवणीसाठी सचिनने ही गाडी आजही ठेवली आहे.

360 Modena Ferrari

Ferrari 360 - Wikipedia

सचिन तेंडुलकरला अनेक नवनवीन आणि वेगवेगळ्या कार खरेदी करण्याची आवड आहे. सध्या त्यांच्याकडे 360 Modena Ferrari देखील आहे. २०२२ मध्ये सचिनला मायकेल शूमाकरने ही कार भेट दिली आहे. ही कार बॉलीवूड चित्रपट ‘फेरारी की सवारी’ मध्ये देखील दिसली आहे. सचिनने ही कार २०११ मध्ये विकली होती.

Nissan GT-R

2022 Nissan GT-R Unveiled, Gets New T-spec Trims - ZigWheels

सचिन तेंडुलकरच्या सध्याच्या कार कलेक्शनमध्ये निसान GT-R सारख्या कारचाही समावेश आहे. या कारची किंमत सुमारे 2.4 कोटी रुपये आहे. या कारचे इंजिन 550Bhp पॉवर जनरेट करते आणि केवळ 2.9 सेकंदात 0-100 किमी प्रति तासाचा वेग पकडते.

BMW X5M

BMW X5 M - X5 M Price, Specs, Images, Colours

सचिन तेंडुलकरच्या या कार कलेक्शनमध्ये अनेक कार आहेत. त्यामध्ये BMW X5M ही देखील आहे. सचिन तेंडुलकर बीएमडब्ल्यू इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे आणि त्याच्याकडे या कंपनीच्या अनेक कार आहेत.

BMW i8

BMW i8 Concept 02

सचिन तेंडुलकरकडे BMW i8 ही देखील एक ब्रँडेड कार आहे. या कारची किंमत जवळपास 2.54 कोटी रुपये आहे. तसेच सचिन तेंडुलकरकडे BMW M5 JAHRE EDITION, Mercedes C36 AMG, BMW 530d, Caterham, 1900 Daimler सारख्या अनेक लक्झरी कारचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe