Sachin Tendulkar Records : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी अनेक वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत. जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. तसेच त्याच्या या रेकॉर्डच्या आसपास देखील कोणीही पोहचू शकलेले नाही.
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील सर्वात जास्त शतक झळकावणारा खेळाडू आहे. तसेच त्याच्या नावावर असे अनेक रेकॉर्ड आहेत जे क्वचितच मोडले जाऊ शकतात. पण आजपर्यंत सचिनची क्रिकेटमधील १० रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही.
सचिन तेंडुलकर याचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला आहे. तसेच सचिन तेंडुलकर याने जवळपास क्रिकेटसाठी २२ वर्षे दिली आहेत. चला तर जाणून घेऊया सचिन तेंडुलकरच्या १० विक्रमाबद्दल
सचिन तेंडुलकरचे न मोडलेले विक्रम
1. 100 आंतरराष्ट्रीय शतक
सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक पूर्ण केली आहेत. १०० शतक करणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. त्याने कसोटीत ५१ आणि वनडेत ४९ शतके झळकावली आहेत.
2. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा क्रिकेटर
सचिन तेंडुलकर यांने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारले आहेत. २०० कसोटी सामन्यात सचिनने एकूण 2127 चौकार आणि षटकार मारले आहेत. यामध्ये 2058 चौकार आणि 69 षटकारांचा समावेश आहे. हे देखील त्याचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही.
3. 6 विश्वचषक खेळणारा एकमेव क्रिकेटर
सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. जो चक्क ६ विश्वचषक खेळला आहे. 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 चा विश्वचषक खेळला आहे.
4. 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा एकमेव खेळाडू
सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे जो सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी-20 सामना खेळ आहे.
5. 164 आंतरराष्ट्रीय अर्धशतके
सचिन तेंडुलकर याने एकूण 164 आंतरराष्ट्रीय अर्धशतके झळकावली आहेत. 96 एकदिवसीय आणि 68 कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.
6. ODI मध्ये सर्वाधिक सामनावीर
सचिन हा ODI मध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू आहे. त्याचा हा विक्रम देखील कोणही मोडू शकलेले नाही. 62 मॅन ऑफ द मॅच सचिन तेंडुलकरने पटकावल्या आहेत.
7. विश्वचषकात 2000 पेक्षा जास्त धावा
विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूं म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. त्याने विश्वचषकात एकूण २ हजारपेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या आहेत. 6 विश्वचषकातील 45 सामन्यात 2278 धावा केल्या आहेत.
8. एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 1998 मध्ये त्याने 34 सामन्यात 1894 धावा केल्या होत्या.
9. सर्वात मोठी एकदिवसीय क्रिकेटमधील कारकीर्द
सचिनची क्रिकेट जगतातील सर्वात मोठी एकदिवसीय कारकीर्द आहे. सचिनने 22 वर्षे 90 दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्याचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.
10. कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा
कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. त्याने कसोटीत 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरचे वरील १० विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.