SBI Bank : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असणारी एसबीआयचे तुम्ही देखील ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून एसबीआय ग्राहकांच्या खात्यातून कोणतेही व्यवहार न करता पैसे कापले जात आहे. तुमच्यासबोत देखील असं घडलं असाल तर टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला सांगतो बँक तुमच्या खात्यातून हे पैसे का कापत आहे.
खात्यातून 147.50 रुपये कापले जात आहेत

सध्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जात असल्याचे चित्र आहे. यासोबतच 147.50 रुपयांच्या कपातीचा मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत हा मेसेज पाहून अनेक ग्राहक बँकेत पोहोचले.
बँक दरवर्षी हे पैसे कापते
बँकेच्या बाजूने याबाबत माहिती देताना एसबीआयकडून ग्राहकांच्या खात्यातून हे पैसे डेबिट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक हे पैसे मेंटेनन्स चार्ज म्हणून घेत आहे. हे पैसे बँकेतून वर्षातून एकदाच घेतले जातात. बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
18% GST असे दिसते
हे पैसे बँकेकडून शुल्क म्हणून कापले जातात. त्याच वेळी, बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डसाठी, ग्राहकांकडून वार्षिक 125 रुपये वसूल केले जातात.18 टक्के दराने जीएसटी जोडला जातो, त्यानंतर ही रक्कम 147.50 रुपये होते.
कार्ड बदलूनही पैसे भरावे लागतात
याशिवाय जर कोणत्याही ग्राहकाला त्याचे डेबिट कार्ड बदलायचे असेल तर त्यासाठी त्याला जीएसटी शुल्कासह बँकेला 300 रुपये भरावे लागतील.
हे पण वाचा :- OnePlus Smart TV Offers : फाडू ऑफर ! स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे आश्चर्यकारक सूट; 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये आणा घरी