SBI चा ग्राहकांसाठी अलर्ट; फसवणुकीपासून सावध रहा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-देशात दिवसेंदिवस बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढत आहेत. दरम्यान अशाच प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना अलर्ट केले आहे.

एसबीआयने आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बँक KYC पद्धतीने ग्राहकांशी बातचित करुन सत्यता पडताळणी करते.

मात्र, याच पद्धतीचा वापर करुन काही भामटे सर्वसामान्यांना लुबाडण्याचं काम करत असल्याचं स्टेट बँकेने ट्विटरवर सांगितलं आहे.

त्यामुळे स्टेट बँकेने KYC च्या नावाने करण्यात आलेल्या बनावट फोन कॉलच्या बळी पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे या गोष्टींची काळजी घ्या ‘कुणासोबतही OTP शेअर करु नका.

रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्सपासून सावध राहा. आपल्या आधारकार्डची कॉपी कुणासोबतही शेअर करु नका. वेळोवेळी आपला पासवर्ड बदला. कुणाहीसोबत आपला मोबाईल नंबर आणि गोपनीय माहिती शेअर करु नका.

कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा बँकेशी संबंधित अपडेटसाठी https://bank.sbi या वेबसाइटला भेट द्या. दरम्यान एसबीआयने सर्व ग्राहकांना सतर्क करणारे काही क्रमांकही जारी केले आहेत.

एसबीआयच्या ग्राहक सेवा क्रमांक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क साधून कोणीही बँकेची माहिती मिळवू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment