Maruti Car Price Hike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकी कंपनीला ओळखले जाते. या कंपनीच्या कार सर्वाधिक खपली जातात. तसेच ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या कार कंपनीकडून सादर केल्या जात आहेत.
कंपनीकडून सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती बलेनोची किंमत वाढवण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. त्यामुळे बलेनो प्रेमींना झटका बसला आहे.
मारुती सुझुकी कंपनीकडून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ही कार बाजारात आणली होती. मात्र आता कंपनीने कार महाग केली आहे. त्यामुळे आता ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
किती वाढली किंमत
जर तुम्ही मारुती बलेनो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्याची किंमत 2000 ते 12000 रुपये महाग करण्यात आली आहे.
नवीन किंमत
भारतामध्ये सुरुवातीला मारुती बलेनो ६.४९ लाख ते ९.७१ लाख रुपयांच्या किमतीमध्ये मिळत होती. मात्र आता तीच मारुती बलेनो भारतात 6.56 लाख ते 9.83 लाख रुपयांच्या किमतीमध्ये मिळत आहे.
नुकत्याच लॉन्च झालेल्या डेल्टा आणि झेटा सीएनजी ट्रिमसाठी सर्वात कमी किमतीत वाढ झाली आहे, ज्यांच्या किमतीत रु. 2,000 रुपयांनी वाढ झाली आहे. सिग्मा, डेल्टा, अल्फा आणि झेटा या मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांच्या किमती प्रत्येकी 7 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, डेल्टा, झेटा आणि अल्फा एएमटी प्रकारांच्या किमतीत 12-12 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.