LIC Scheme : एलआयसीकडून एक से बढकर एक भन्नाट योजना ग्राहकांसाठी सादर केल्या जात आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून ग्राहक लखपती बनू शकतात. तसेच एलआयसी गुंतवणूक अजिबात जोखमीची नाही. यामध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करू शकता.
प्रत्येकजण आजकाल गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी अनेकजण बँक किंवा इतर पर्याय निवडत आहेत. मात्र एलआयसीमधील गुंतवणूक तुम्हाला काही दिवसात मालामाल करू शकते.
ज्या गुंतवणूकदारांना बचत आणि विमा दोन्हींचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एलआयसीच्या विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.
LIC च्या जीवन प्रगती विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांत लाखपती बनू शकता. 12 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील लोक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
जीवन प्रगती विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. LIC कमी गुंतवणुकीत जास्त फायदे देत आहे. त्यामुळे अनेकजण गुंतवणुकीसाठी LIC चा पर्याय निवडत आहेत.
असा होईल 28 लाखांचा फायदा
LIC च्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला रु. 28 लाखाचा संपूर्ण निधी मिळू शकतो.
जर तुम्ही दररोज 200 रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 6,000 रुपये गुंतवावे लागतील.
या प्रकरणात, तुमची वार्षिक गुंतवणूक 72 हजार रुपये असेल.
या योजनेत गुंतवणूक केल्यावर, दर 5 वर्षांनी जोखीम संरक्षण वाढते.
या प्रकरणात, जर तुम्ही 4 लाख रुपयांची पॉलिसी घेतली असेल, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 4 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपयांचे कव्हर मिळेल.
10 वर्षांनंतर ते 6 लाखांपर्यंत वाढेल आणि 15 वर्षानंतर ते 6 लाखांचे संरक्षण देईल. त्याच वेळी, 20 वर्षांनंतर, ही पॉलिसी 7 लाखांचे संरक्षण देईल.
जर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची रक्कम कुटुंबातील नॉमिनी केलेल्या व्यक्तीला मिळेल. तसेच बोनसचीही रक्कम दिली जाते. 20 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला व्याज, बोनससह एकूण 28 लाख रुपयांचा फायदा होईल.