Mobile Apps : आजकाल बहुतेक सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनवर अनेकांची फसवणूक झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र तुमचीही फसवणूक होऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनमधील काही ॲप तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.
गुगल प्ले स्टोअर्सवर अनेक ॲप उपलब्ध आहेत. मात्र ते ॲप स्मार्टफोनमध्ये घेताना काळजी घेणे गरजचे आहे. तसेच आता आधुनिक युगात ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया आली आहे. तसेच यासाठी अनेक ॲप देखील उपलब्ध आहेत.
जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट साठी गुगल प्ले स्टोअर्सवर ॲप घेत असाल तर थोडं थांबा. कारण आता काही ॲपद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
हे 5 ॲप्स सर्वात धोकादायक
अहवालानुसार असे काही २ ॲप आढळून आले आहेत ज्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. अशा ॲपवर हॅकर्सचा डोळा आहे. त्यामुळे जर तुम्हीही असे ॲप वापरत असाल तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
अशा ॲपद्वारे तुमचा खाते क्रमांक, लॉगिन आयडी माहिती मिळवली जाऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट व्यवहार करत असताना खबरदारी घेणे गरजचे आहे.
हे ॲप्स त्वरित डिलीट करा
Manager Small Lite
My Finances Tracker
Zetter Authentiction
Codice Fiscale 2022
Recover Audio
Image and Videos