Solar Stove Price : सिलिंडरच्या त्रासातून मिळणार सुटका ! दरमहा होणार मोठी बचत ; फक्त घरी आणा ‘हा’ स्टोव्ह

Published on -

Solar Stove Price :  आज मोठ्या प्रमाणात आपल्या देशात गॅस सिलेंडरचा वापर होत आहे. जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरचा वापर होतो यामुळे दरमहा गॅस सिलेंडरसाठी खर्च करावा लागतो.

यामुळे आज आम्ही या लेखात तुम्हाला एका जबरदस्त सोलर स्टोव्हबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने दरमहा होणार गॅस सिलेंडरचा खर्च वाचवू शकतात. चला मग जाणून घेऊया या  सोलर स्टोव्हबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हा सोलर स्टोव्ह अगदी स्वस्तात उपलब्ध आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हा सोलर स्टोव्ह तुम्ही आता अवघ्या 12 हजारात घरी आणू शकतात आणि  आयुष्यभर मोफत अन्न शिजवू शकता. हा सोलर स्टोव्ह तुमच्या मासिक खर्चात बचत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या सोलर स्टोव्हचा नाव सूर्य नूतन सोलर स्टोव्ह आहे. सध्या हा स्टोव्ह खूप चर्चेत आहे.

सूर्य नूतन सोलर स्टोव्हची किंमत किती आहे?

सूर्य नूतन सोलर स्टोव्हचे दोन व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. एक व्हेरियंट 12 हजार रुपयांना तर टॉप व्हेरिएंट 23 हजार रुपयांना उपलब्ध आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने अद्याप हा स्टोव्ह बाजारात आणलेला नाही, मात्र लवकरच तो बाजारात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. हा स्टोव्ह इंडियन ऑइल गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपावर उपलब्ध असेल.

सोलर स्टोव्हची खासियत काय आहे

हा स्टोव्ह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने बनवला आहे. जुना सोलर स्टोव्ह उन्हात ठेवावा लागत होता, पण सूर्यनूतन स्टोव्ह किचनमध्ये बसवून वापरता येतो. हे नवीन तंत्रज्ञान सूर्य नूतन सोलर स्टोव्ह आहे जे तुम्हाला गॅस किंवा विजेवर एक पैसाही खर्च न करता आयुष्यभर स्वयंपाक करू देते.

सोलर स्टोव्ह दोन युनिट्सचा बनलेला असतो. एक युनिट स्वयंपाकघरात तर दुसरे युनिट बाहेर उन्हात ठेवले जाते. हे दिवस आणि रात्री दोन्ही वापरले जाऊ शकते. दिवसा ऊर्जा साठवून रात्री वापरता येते. या स्टोव्हचा वापर करून, तुमची गॅस आणि विजेशी संबंधित त्रासातून सुटका होईल आणि तुम्ही आयुष्यभर मोफत अन्न शिजवू शकता.

हे पण वाचा :- Indian Railway Update : रेल्वेने घेतला मोठा निर्णय ! आता महिलांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News