अहमदनगर लाईव्ह 24 टीम: गुजरातमधील गांधीनगर येथे तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला मंगळवार २८ जानेवारीला सुरूवात झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी गुरूवारी दूरस्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
पंतप्रधानांनी बटाटा संशोधन, व्यापार आणि उद्योग, आणि मूल्य साखळी व्यवस्थापन या क्षेत्रातील संपूर्ण कामगिरी आणि संधींचा आढावा घेऊन दशकासाठी एक रोडमॅप तयार केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्याची परिषद ही या मालिकेतली तिसरी जागतिक बटाटा परिषद आहे. प्रत्येक १० वर्षात बटाट्याच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी माहिती असणे आवश्यक आहे आणि येणाऱ्या दशकात एक रोडमॅप निश्चित केला जावा.
या उद्देशाने मागील दोन दशकात १९९९ आणि २००८ मध्ये अशाच प्रकारची जागतिक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली होती. सलग तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत १० विषय चर्चिले जातील.