Steel and Cement Price : कमी खर्चात बांधा सुंदर आणि मोठे! स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण, हे आहेत नवीन दर

Ahmednagarlive24 office
Published:

Steel and Cement Price : तुम्हीही घर बांधण्यासाठी रात्र न दिवस मेहनत करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही कमी खर्चामध्ये सुंदर आणि मोठे घर बांधू शकता. स्टील आणि सिमेंटच्या किमतीत घसरण झाल्याने घर बांधणे सोपे झाले आहे.

प्रत्येकाचे छोटे का होईन पण स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र काही कारणास्तव हे घर बांधणे शक्य होत नाही. अनेकजण जास्त पैसे लागत असल्याने घर बांधणे टाळत असतात. पण आता कमी बजेट असणारे देखील घर बांधू शकतात.

सध्याच्या काळात घर बांधण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण स्टील आणि सिमेंट कमी दरात मिळत आहे. घर बांधत असताना स्टील आणि सिमेंट मोठ्या प्रमाणात लागत असते. त्यामुळे या दोन वस्तू खरेदी करण्यातच खूप पैसे जातात.

पण आता स्वस्तात उपलब्ध असलेले स्टील आणि सिमेंट खरेदी करून तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता. तसेच बांधकाम साहित्याच्या किमती देखील उतरल्या आहेत. या ठिकाणी देखील तुमच्या पैशांची बचत होईल.

गेल्या काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तसेच स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ-उतार कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंट खूप स्वस्त झाले आहे.

गेल्या वर्षी स्टीलच्या किमती ७० हजार रुपये प्रति टनच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे स्टील खरेदीसाठी सर्वाधिक पैसे लागत होते. तसेच सिमेंट प्रति बॅग ४०० रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच स्वस्त मिळत आहे.

स्टीलचे आजचे दर

मुंबई                 महाराष्ट्र            49000 रुपये प्रति टन
जालना              महाराष्ट्र            48700 रुपये प्रति टन
कोलकाता         पश्चिम बंगाल      46200 रुपये प्रति टन
हैदराबाद          तेलंगणा             48100 रुपये प्रति टन
चेन्नई               तामिळनाडू         49600 रुपये प्रति टन

सिमेंटचे नवीन दर

43 ग्रेड 330-370 रुपये ACC सिमेंटची किंमत
53 ग्रेड 410-455 रुपये ACC सिमेंटची किंमत

43 ग्रेड 340-380 रुपये अल्ट्राटेक सिमेंटची किंमत
53 ग्रेड 410-430 रुपये अल्ट्राटेक सिमेंटची किंमत

43 ग्रेड 330-350 रुपये अंबुजा सिमेंटची किंमत
53 ग्रेड 380-400 रुपये अंबुजा सिमेंटची किंमत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe