Steel and Cement Price : घर बांधणे झाले आणखी सोपे! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या नवीनतम दर ,

Ahmednagarlive24 office
Published:

Steel and Cement Price : तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असताल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंट खूपच स्वस्त मिळत आहे.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. पण सध्या स्टील आणि सिमेंटच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वप्नातील घर बांधणे सहज शक्य झाले आहे.

सध्याच्या काळात घर बांधण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण स्टील आणि सिमेंट कमी दरात मिळत आहे. घर बांधत असताना स्टील आणि सिमेंट मोठ्या प्रमाणात लागत असते. त्यामुळे या दोन वस्तू खरेदी करण्यातच खूप पैसे जातात.

पण आता स्वस्तात उपलब्ध असलेले स्टील आणि सिमेंट खरेदी करून तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता. तसेच बांधकाम साहित्याच्या किमती देखील उतरल्या आहेत. या ठिकाणी देखील तुमच्या पैशांची बचत होईल.

गेल्या काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तसेच स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ-उतार कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंट खूप स्वस्त झाले आहे.

गेल्या वर्षी स्टीलच्या किमती ७० हजार रुपये प्रति टनच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे स्टील खरेदीसाठी सर्वाधिक पैसे लागत होते. तसेच सिमेंट प्रति बॅग ४०० रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच स्वस्त मिळत आहे.

सिमेंटचे दर

अल्ट्राटेक सिमेंट330 रूपये प्रति बॅग
अम्बूजा सिमेंट330 रूपये प्रति बॅग
एसीसी सिमेंट375 रूपये प्रति बॅग
बिरला सिमेंट375 रूपये प्रति बॅग
जे.के. सिमेंट390 रूपये प्रति बॅग
डालमिया सिमेंट410 रूपये प्रति बॅग
जेपी सिमेंट390 रूपये प्रति बॅग

स्टीलचे नवीन दर

दिल्ली53,300 – 51,400 रुपये / प्रति टन
मुंबई55,100 – 52,800 रुपये / प्रति टन
गोवा53,500 – 51,300 रुपये / प्रति टन
गाजियाबाद52,200 – 49,500 रुपये / प्रति टन
नागपुर51,900 – 47,800 रुपये / प्रति टन
हैदराबाद52,000 – 50,500 रुपये / प्रति टन
भावनगर54,500 – 52,500 रुपये / प्रति टन
इंदौर54,200 – 52,800 रुपये / प्रति टन
जयपुर53,100 – 50,000 रुपये / प्रति टन
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe