Sun : सूर्याच्या पृष्ठभागाचा एक मोठा भाग तुटला असून त्याच्या उत्तर ध्रुवाभोवती चक्राकार वावटळी निर्माण झाले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचे फोटो व्हायरल होत आहेत. शास्ज्ञज्ञांना हे चित्र दिसल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सुर्याचा हा मोठा भाग तुटल्याचा परिणाम पृथ्वीवर कसा होईल याचा अंदाज आता शास्त्रज्ञ लावत आहेत. दरम्यान, सौर प्लाझ्माचा एक मोठा फिलामेंट सूर्याच्या पृष्ठभागापासून बाजूला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळ वावटळ उटल्याचे दिसत आहे.
शास्त्रज्ञांनी याआधी सूर्यापासून काही भाग फुटताना पाहिले असले तरी, ध्रुवीय वावटळी निर्माण होताना त्यांनी प्रथमच पाहिले आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. प्रामिनन्स हे सूर्याच्या पृष्ठभागापासून बाहेरच्या दिशेने पसरलेले एक मोठे तेजस्वी फिचर आहे.
भूतकाळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु आता जी गोष्ट घडली आहे त्यामुळे शास्त्रज्ञांना धक्का बसला आहे. आता अंतराळ शास्त्रज्ञ या विचित्र घटनेचे विश्लेषण करत आहेत. सूर्याचा भाग वेगळा झाल्यानंतर मोठं वावटळ निर्माण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या तमिथा स्कोव्ह यांनी या संबंधित काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये सौर प्लाझ्माचा एक मोठा फिलामेंट सूर्याच्या पृष्ठभागापासून बाजूला जात असल्याचे दिसून आले आहे.