Tata Motors cars Price Hike : टाटा मोटर्सच्या अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच टाटा कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवीन कार देखील लॉन्च केली जात आहेत. मात्र आता टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
टाटा मोटर्सकडून कारच्या किमती वाढवल्या जाणार असल्याने ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. आता ग्राहकांना वाढीव दराने कार खरेदी कराव्या लागणार आहेत. टाटा कंपनीकडून कारच्या किमती सरासरी 0.6% ने वाढवल्या जाणार आहेत.

अधिकृत निवेदनात, टाटा मोटर्सने सांगितले की, नियामक बदलांमुळे आणि एकूण इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने खर्चात लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात या दरवाढीतून जावे लागत आहे.
यामुळे किमती वाढल्या
1 एप्रिल 2023 रोजी लागू झालेल्या BS6 स्टेज 2 उत्सर्जन नियमांमधील बदलामुळे ही दरवाढ झाली आहे. सर्व वाहन निर्माते e20 इंधन-कार्यक्षम मॉडेल लॉन्च करण्याच्या दिशेने काम करत आहेत, ज्यामुळे कारच्या किमती वाढल्या आहेत.
फेब्रुवारीमध्ये केलेल्या दरवाढीनंतर कंपनीने प्रवासी वाहनांसाठी केलेली ही दुसरी दरवाढ असेल. ऑटोमेकरने प्रवासी वाहनांच्या अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) पोर्टफोलिओमध्ये सरासरी 1.2% ने वाढ केली होती. गेल्या महिन्यात, टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 5% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली.
टाटा मोटर्सकडून या कार महाग केल्या जाणार
टाटा मोटर्सकडून कंपनीच्या अधिक लोकप्रिय असलेल्या कारच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. टियागो, टिगोर, पुनाच, हॅरियर, नेक्सॉन आणि सफारी सारख्या प्रमुख कार महाग केल्या जाणार आहेत. १ मे म्हणजे आजपासून या कारच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. टाटा मोटर्सच्या या कारच्या किमती 5.54 लाख रुपये आणि 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
फक्त टाटा मोटर्सच नाही तर ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या आहेत. मारुतीपासून ह्युंदाई आणि होंडा पर्यंत, कार निर्मात्यांनी त्यांच्या कारच्या किंमती प्रकारानुसार 2,000 ते 15,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत.