Tata Nano Electric Car : भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. तसेच अजूनही अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. आता टाटा कंपनीकडून देखील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार नॅनो लॉन्च केली जाणार आहे.
देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत असल्याने अनेकांना पेट्रोल आणि डिझेलवरील कार वापराने परवडत नाही. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीत देखील वाढ झाली आहे.
आता टाटा मोटर्सकडून देखील काही वर्षांपूर्वी सर्वाधिक फेमस झालेली स्वस्तातील नॅनो कार आता इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ही इलेक्ट्रिक नॅनो कार देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
टाटा मोटर्सकडून आता इलेक्ट्रिक नॅनो कार लॉन्च करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच कंपनीकडून या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सर्व फीचर्सने सुसज्ज असलेली इलेक्ट्रिक कार स्वस्तात मिळणार आहे.
इलेक्ट्रिक कारची निर्मिती
इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकांना कार आणि बाईक चालवणे परवडत नव्हते. हेच कारण लक्षात घेत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यास सुरुवात केली. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण देखील कमी होत आहे. त्यामुळेच आता टाटा नॅनो देखील इलेक्ट्रिक अवतारात बाजारात दाखल होणार आहे.
Tata Nano EV ची संभाव्य वैशिष्ट्ये
टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये 624cc ट्विन सिलेंडर दिले जाऊ शकतात. यामध्ये पेट्रोलचाही सपोर्ट असेल आणि या क्षमतेनुसार ही कार 38bhp पॉवर आणि 51Nm टॉर्क जनरेट करेल. यात 4 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.
टाटा नॅनो या इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरीपॅक देखील जबरदस्त दिला जाऊ शकतो. कारण सिंगल चार्जमध्ये ३०० किमी कार धावू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच ही इलेक्ट्रिक कार 60 ते 70 किमीचा टॉप स्पीड देईल असे देखील सांगण्यात येत आहे.
टाटा नॅनो EV अपेक्षित किंमत
टाटा मोटर्सकडून गेल्या काही वर्षांपूर्वी टाटा नॅनो ही कार पेट्रोल व्हर्जनमध्ये लॉन्च केली होती. तसेच सर्वसामान्यांना कार खरेदी करता यावी यासाठी कंपनीकडून याची किंमत देखील अगदी कमी ठेवण्यात आली होती.
तसेच आता देखील टाटा मोटर्सकडून टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची किंमत अगदी कमी ठेवण्यात येऊ शकते. २०२४ पर्यंत ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची किंमत ५ लाखांपेक्षा कमी असू शकते. याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.