Tata Tigor EV : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. तसेच आता टाटा मोटर्सकडून टिगोर इलेक्ट्रिक कार नवीन लूकमध्ये लॉन्च केली आहे. तसेच ही कार कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक रूपात लॉन्च करण्यात आली आहे.
टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक SUV Nexon EV आणि इलेक्ट्रिक हॅचबॅक Tigo EV तसेच इलेक्ट्रिक सेडान Tigor EV कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च केल्या आहेत. टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार Tigor EV चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे.
इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार उत्पादित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. टाटा मोटर्सकडून आतापर्यंत ३ इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत.
टाटा कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या Tigor EV ची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
टाटा मोटर्सकडून प्रीमियम फीचर्स आणि अधिक रेंजसह अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना संपूर्ण फीचर्सने सुसज्ज असलेली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.
जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टाटा टिगोर ही इलेक्ट्रिक कार सर्वोत्तम ठरू शकते. 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही टिगोर EV ला घरी नेऊ शकतो.
टाटा मोटर्स नवीन टिगोर ईव्हीचे एकूण चार प्रकार लॉन्च केली आहेत. XE, XT, XZ+ आणि ZX+ Lux व्हेरियंट बाजारात उपलब्ध होणार आहेत. या कारमध्ये दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.
Tigor EV: प्रीमियम वैशिष्ट्ये
कारमध्ये आता 7-इंच टचस्क्रीन आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्ससह अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. यात रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी – Zconnect सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
याशिवाय क्रूझ कंट्रोल, स्मार्टफोन अॅप-चालित अप्रत्यक्ष टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि स्मार्ट वॉच इंटिग्रेटेड कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.