Optical Illuison : तुम्हालाही ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यास आवडत असतील तर आजकाल सोशल मीडियावर अशी अनेक चित्रे व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला काहीतरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. पण शोधण्यास सांगितलेली वस्तू सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.
अनेक लोकांना चित्रात दिलेले आव्हान स्वीकारण्यात आनंद वाटतो. त्यामुळे अशा लोकांची नजर तीक्ष्ण होते तसेच मेंदूचाही चांगला व्यायाम होतो असे तज्ञ सांगत असतात. ऑप्टिकल इल्युजन चित्रामुळे निरीक्षण कौशल्ये देखील सुधारतात.

मात्र ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सहजपणे सोडवणे फार कठीण असते. त्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने चित्राचे निरीक्षण करावे लागेल. जर तुम्ही चित्रात लपलेली मांजर शोधून काढली तर तुमची निरीक्षण करण्याची कौशल्ये अधिक आहेत.
या चित्रात एक मांजर लपलेली आहे जी तुम्हाला शोधायची आहे. मांजर शोधण्यासाठी नऊ सेकंद देण्यात आले आहेत. या ९ सेकंदामध्ये तुम्हाला चित्रातील मांजर शोधून काढायची आहे.
ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये आपल्या डोळ्यासमोर गोष्टी असतात पण त्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यासाठी शांत डोक्याने आणि बारकाईने चित्र पाहावे लागेल. तेव्हाच तुम्हाला चित्रातील मांजर सापडेल.
अशा चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे लपलेल्या असतात की त्या शोधणे फार कठीण असते. चांगले लोक त्यांना शोधण्यात अपयशी ठरतात. ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळात पडतात.
तुमची नजर तीक्ष्ण असूनही तुम्हाला मांजर सापडली नसेल तर काळजी करू नका. खालील चित्रामध्ये तुम्ही सहज आणि तुमच्या डोळ्यांनी स्पष्ट मांजर पाहू शकता.