TATA Car : टाटा मोटर्सकडून अनेक नवनवीन कार बाजारात सादर केल्या जात आहेत. तसेच टाटा मोटर्सच्या कारची किंमत कमी आणि जबरदस्त मायलेज देत असल्याने ग्राहकही या कंपनीच्या कारकडे चांगलेच आकर्षित होत आहेत.
टाटा कंपनीकडून आता लवकरच कमी किमतीमधील मिनी Suv सादर केली जाणार आहे. या कारची किंमत अगदी कमी असणार आहे. आजकाल स्मार्टफोन जितके महाग झाले आहेत त्या किमतीमध्ये ही कार उपलब्ध असेल.

प्रत्येकाचे आता कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता टाटा मोटर्स TATA नॅनो ही मिनी Suv कार आणणार आहे. या कारची किंमत अल्टो पेक्षा असणार आहे. जर तुम्ही आयफोन खरेदीसाठी गेला तर तुम्हाला लाखो रुपये मोजावे लागतात याच किमतीमध्ये तुम्हाला ही कार मिळेल.
टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही बनवतात. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला आणि ते आता 85 वर्षांचे आहेत.
रतन टाटा यांनी सर्वात प्रथम सामान्यांसाठी कार आणली होती. मात्र ही कार जास्त काळ बाजारात टिकू शकली नाही. मध्यमवर्गीयांसाठी टाटा नॅनो कार रतन टाटा यांनी बाजारात दाखल केली होती. त्यावेळी या कारची किंमत १ लाख ठेवण्यात आली होती.
रतन टाटा यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नॅनोबद्दलचा किस्सा शेअर केला आहे
रतन टाटा यांनी मध्यमवर्गीय लोकांसाठी एक स्वप्न पाहिले होते, ते 86 व्या वाढदिवसापूर्वी पुन्हा पूर्ण होणार आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये नॅनोबद्दलचा एक किस्सा शेअर केला होता.
रतन टाटा म्हणाले होते- डूडल बनवताना मी अनेकदा विचार करायचो की जर बाईकच सुरक्षित असेल तर बरं होईल. असा विचार करून मी एका गाडीचे डूडल बनवले, जे बग्गीसारखे दिसते. यानंतर मला कार बनवण्याची कल्पना सुचली आणि मग सर्वसामान्यांसाठी टाटा नॅनो आणली. ही गाडी आम्हा सर्वसामान्यांसाठी होती.
रतन टाटा यांनी मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी ही Mini SUV पाहिली होती, TATA Nano चे स्वप्न आता पूर्ण झाले आहे, आता Alto पेक्षा कमी किमतीत TATA Nano खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.