चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

Ahmednagarlive24
Published:

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीदेशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत तर १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सरकारने दिली.

बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढून १९.८० टक्के झाल्याचे सांगत सरकारने संसर्गाचा वेग स्थिर ठेवण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे.

बुधवारी देशव्यापी लॉकडाऊनला एका महिना पूर्ण झाला असल्याने या ३० दिवसांतील तुलनात्मक आकडेवारीही सरकारने सांगितली. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तपासण्यांमध्ये २४ टक्के तर नव्या रुग्णांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे.

२३ मार्च रोजी देशात १४ हजार ९१५ चाचण्या झाल्या होत्या. तर २२ एप्रिलपर्यंत ५ लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ ३० दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांमध्ये ३३ टक्के वाढ झाली आहे.

अर्थात हे पुरेसे नसून, अधिकाधिक चाचण्यांची गरज आहे, असे कोरोनावरील विशेषाधिकार समूहाचे प्रमुख व पर्यावरण सचिव सी.के. मिश्रा म्हणाले.

लॉकडाऊनच्या एका महिन्याच्या कालावधीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यात, संसर्गाचा धोका कमीत कमी ठेवण्यास आवर घालण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या ३० दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी तेव्हाच्या आणि आताच्या चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४.५ टक्क्यांवर स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment