एव्हरेस्टवरील बर्फाचा थर होतोय गायब ! दीड-दोन महिन्यात तब्बल ४९२ फूट बर्फाची झाली वाफ

Mahesh Waghmare
Published:

जगातील सर्वोच्च पर्वतशिखर एव्हरेस्टवरील बर्फाचा थर दोन महिन्यांहून कमी कालावधीत तब्बल ४९२ फुटांनी घटल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. २०२४-२०२५ वर्षातील हिवाळ्यात ही गंभीर बाब घडली.

हे एव्हरेस्टवर जमलेला बर्फ वेगाने गायब होत असल्याचे हे संकेत आहेत. वेगवान वारे आणि उष्ण तापमानामुळे बर्फाचे द्रवीकरण न होता थेट बाष्पीभवन होत असल्याचेही निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणानुसार एव्हरेस्टवरील बर्फाच्या थर वेगाने घटताना दिसून येत आहे.

अमेरिकेच्या निकोल्स महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक व हिमशिखराचे अभ्यासक मॉरी पेल्टो यांनी यासंबंधीचा अभ्यास केला आहे. बर्फाचा थर कमी होत असल्याने ‘हिम रेषा’ वाढत चालल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

पर्वतावर बर्फ कायमस्वरूपी राहणाऱ्या भागाची उंची दर्शविण्यासाठी ‘हिम रेषा’ या शब्दाचा वापर केला जातो. सामान्यतः बर्फ वितळण्याची प्रक्रिया ही पर्वताच्या कमी उंचीवर नोंदवली जाते. पण बर्फ वितळण्यास सुरूवात होणे हा वाढत्या उष्ण तापमानाचा परिणाम आहे, असा इशारा पेल्टो यांनी दिला.

हिवाळयात उष्ण आणि शुष्क परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यात वर्ष २०२१, २०२३, २०२४ आणि २०२५ च्या हिवाळ्याचा समावेश आहे. परिणामी एव्हरेस्टवरील बर्फाचा थर कमी होत चालला आहे. हिम रेषाची उंची वाढत असून जंगलात वणव्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत असल्याचे पेल्टो म्हणाले.

दररोज घटतोय २.५ मिमी बर्फ

एव्हरेस्ट परिसरात प्रत्येक हिवाळ्याच्या सुरूवातीला काही प्रमाणात बर्फवृष्टी होते. मात्र, बर्फाचे थर अधिक काळ टिकून राहत नसल्याचे चित्र आहे. यावरून एव्हरेस्टच्या ६००० मीटर उंचीवर देखील बर्फ वितळणे सुरू असल्याचे दिसून येते. हिवाळ्यात इतक्या उंचीवरील बफचि थर कमी होणे हे चिंताजनक आहे. बफचि थेट वाष्पीभवनात रुपांतर होत आहे. यामुळे दररोज २.५ मिलीमीटरपर्यंत बर्फ घटत असल्याचे संशोधकांनी म्हटले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe