पारा घसरला आणि उत्तर भारत गारठला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- उत्तर भारतात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

त्याचा प्रभाव मध्य भारत आणि पश्चिम भारतातील काही ठिकाणी जाणवणार असून या भागातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या चोवीस तासांमध्ये हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा खाली गेल्याचं पाहायला मिळालं.

परिणामी येथील बहुतांशई भागांमध्ये बर्फवृष्टीही झाली. हिमाचल प्रदेशात रविवारी कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं.

तर, राज्यातील काही भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊसही झाला. हवामान खात्याकडूनच ही माहिती देण्यात आली. शिमला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांच्या कालावधीत किलाँगमध्ये 15 सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झाली.

कर, कल्पामध्ये 4.6 सेमी, कुफरी येथे 2 सेमी बर्फवृष्टी झाली. याशिवाय कांगडा 25.4 मिमी, चंबा 20 मिमी, पालमपूर, 17 मिमी, धरमशाला 14.8 मिमी, मनाली 10 मिमी आणि शिमला 1.7 मिमी अशा स्वरुपात पावसाचा शिडकावा झाल्याचंही सांगण्यात आले आहे.

वरील काही भागात अतिशय दाट धुके राहू शकते. तसेच महाराष्ट्रातील काही भागांतही थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment