IMD Alert : देशात सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु असल्याने अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणात बदल होत असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील काही भागात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात वातावरण कोरडे आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे काही राज्यांमध्ये पाऊस आणि डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या परिसरात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाले आहे. त्यामुळे जोरदार वारे वाहणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्रातून वाऱ्यांसह ओलावा मिळत असल्याने ढग तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे उत्तर मध्य प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. राजधानीतील वाऱ्याची दिशा सध्या उत्तरेकडे असली तरी ढगांच्या आच्छादनामुळे रात्रीचे तापमान वाढेल. यासोबतच वाऱ्याचा वेगही ताशी 12 किलोमीटर इतका आहे. त्यामुळे रविवारी राजधानीच्या किमान तापमानात घट होणार आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीमध्ये एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयीन प्रदेशात धडकेल. त्यामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये आज आणि उद्या पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर उत्तराखंडमध्ये आज काही उंचीच्या भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.
वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाल्याने अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे तर काही भागात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात थंडीमध्ये चढ-उतार कायम आहे.